सध्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे तर काही भागात अनेक नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे. श्री सिद्धिविनायक न्याय मंदिरांचे विशस्त तथा आटपाडीचे सुपुत्र राजाराम देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन खानापूर आटपाडी मतदारसंघातील विविध विकासकांमाचे प्रश्न मांडले. मुंबई येथील राजभवन आयोजित समारंभात विश्वस्त देशमुख यांना निमंत्रण दिले होते.
त्यावेळी त्यांनी उपस्थित राहून श्री सिद्धिविनायक न्यास मंदिराबाबत आढावा दिला. राज्य सरकारकडून श्री सिद्धिविनायक मंदिरांच्या विकासाबाबत ठोस निर्णय घेतले जातात. असे त्यांनी यावेळी सांगितले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात आटपाडीचे सुपुत्र राजाराम देशमुख यांनी ठसा उमटविला आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिध्दीविनायक देवस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी केले कार्य राज्यात आणि देशातही गौरविले गेले आहे.
शिवाय परदेशातील भक्तांनीही राजाराम देशमुख यांनी देवस्थानचे विश्वस्त म्हणून योगदान प्रशंसनीय असल्याची भावना मांडल्या आहेत. मुंबई येथील राज भवन येथील कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी आटपाडी खानापूर मतदारसंघातील विविध विकास कामाबाबत व मंदिर विकासाची माहिती यावेळी विश्वस्त राजाराम देशमुख यांनी दिली. राज्यातील विविध सामाजिक राजकीय विषय घेऊन राजकीय वरिष्ठ नेते मंडळीशी चर्चा करून प्रश्न सोडवून घेण्यामध्ये ते अग्रेसर आहेत.