मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीर असून मला विजयी करेल आमदार आवळे यांचा विश्वास 

हातकणंगले मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या सोबत झालेल्या हुपरी येथे संवाद बैठक झाली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.  महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. महाविकास आघाडी ही दिलेला शब्द पूर्ण करणारी आहे.

राज्यातील जनतेच्या हितासाठी प्रगतीसाठी जाहीर केलेला जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत सर्वात आघाडीवर राहण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. मला निवडून देवून दुस-यांदा विधानसभेत पाठवा. जनतेचा सेवक म्हणून काम करण्यास मी कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजू आवळे यांनी दिले.

शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. शेतमालाला हमी भाव दिला जाईल. गरीब कुटुंबाला २५ लाखांचा आरोग्यविमा तसेच सरकारी रुग्णालयात मोफत औषधे दिली जाणार आहेत. वृध्द कलावंतांच्या मानधनात वाढ व पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवले जाणार आहेत. नोकरीतील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार आहोत. पाच वर्षात साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार देण्यात येणार आहे.

पेपर फुटी विरोधातील कायदा आणखी कडक करणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. ३०० युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना १०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमध्ये स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल. हि निवडणुक देशाचे भविष्य बदलणारी आहे. मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीर असून मला विजयी करेल असा विश्वास आहे असे आमदार आवळे म्हणाले.