विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस दलातर्फे ड्रोन कॅमेर्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. मंगळवारी विटा, जत, पलूस आणि कवठेमहांकाळ येथील विविध भागावर वॉच ठेवण्यात आला होता.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सांगली जिल्हा पोलिस दलामार्फत शासकीय ड्रोन कॅमेर्यांची करडी नजर ठेवण्यात येत आहे. मतदारांना पैसे वाटप, आक्षेपार्ह वस्तूंचे वाटप, प्रलोभने दाखविणे आदी बाबी लक्षात याव्यात याकरिता ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
मंगळवारी कवठेमहांकाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, जत शहरातील पारधी वस्ती, हनुमान मंदिर परिसर, जत एसटी स्टॅण्ड परिसर, विटा शहरातील शिवाजी चौक, खानापूर नाका, पलूस शहरातील बौद्धनगर वसाहत, मातंग वसाहत, बसस्थानक परिसर या ठिकाणी ड्रोन फिरविण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, उपनिरीक्षक अफरोज पठाण, हेड कॉन्टेबल मुजावर यांच्या पथकाने गैरप्रकारांवर नजर ठेवली आहे.