कोल्हापूरात भगव्या टोपीवरून वाद पेटला, गावात तणावाचे वातावरण

कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरमध्ये मतदान केंद्रावर भगव्या टोप्या घालून मतदार आल्याने मोठा वाद झाल्याची घटना घडली आहे. या मतदारांना भगव्या टोप्या काढण्यास सांगितले होते.मात्र मतदारांनी यास थेट नकार दिला आहे.तसेच भगव्या टोप्यांना विरोध केल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

कोल्हापूरच्या शिरोली पुलाची येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या मतदान केंद्रावर अनेक उमेदवार भगवी टोपी परिधान करून मतदानाचा हक्क बजावण्यास आले होते. मात्र भगवी टोपी घालून मतदान करण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे भगव्या टोपीला नकार दिल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. यामुळे परिसरात धार्मिक तणावाचे वातावरण पसरले आहे.