बॉलीवूड स्टार्सप्रमाणे त्यांची मुलंही लक्झरी लाइफस्टाईल जगतात. अनेक स्टार्सच्या मुलांनीही आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यामध्ये अनन्या पांडे, सुहाना खानपासून सारा अली खानपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर आज ते स्वतः कोट्यवधींचे मालक आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आज इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत स्टार किडची ओळख करून देत आहोत.
या स्टारकीडबाबत एक आश्चर्याची बाब म्हणजे, अजून या स्टारकीडनं बॉलिवूड डेब्यू केलेला नाही.आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानबाबत. आर्यन हा शाहरुख खानचा मोठा मुलगा आहे.विशेष म्हणजे, आर्यन खान अभिनयाच्या दुनियेत नाही तर त्याच्या वडिलांप्रमाणे दिग्दर्शनाच्या जगात उतरणार आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच आर्यन खान कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खानची एकूण संपत्ती त्याची बहीण सुहाना खानपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. वयाच्या 26 व्या वर्षी आर्यन 90 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. तर आर्यनची बहीण सुहाना खाननं ‘द आर्चीज’ मधून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. सुहाना सुमारे 40 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण आहे.
काही वर्षांपूर्वी आर्यन खानचं नाव ड्रग प्रकरणाशी जोडलं गेले आहे. त्यामुळे तो बराच काळ तुरुंगातही होता, तरीसुद्धा त्याच्या संपत्तीवर कोणताही परिणाम झालेला नाही. येत्या काही दिवसांतच आर्यन खान एका सीरिजद्वारे दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश करत आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर याची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.