महायुती सरकारने शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. या दिवसांचा व्हिजन डॉक्युमेंट मांडू, असे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते. पण त्यात सरकारला अपयश आलेले आहे. राज्यात या शंभर दिवसांत काय दिसले तर हत्याकांड, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, वाचाळवीर, दंगली आणि बीडमध्ये झालेले हत्याकांड, जग तंत्रज्ञानाच्या मागे आहे आणि आपण कबरीच्या अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत टीका केली. ते म्हणाले, सामान्य माणसाला आवाज राहिलेला नाही.
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर सांगण्यात आलं की, हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. मात्र न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीतून निष्कर्ष काढला की पोलिसच मृत्यूला जबाबदार आहेत. हा ४५१ पानांचा गोपनीय अहवाल विधानमंडळासमोर आला पाहिजे अशी मागणी करत असतानाच त्यांनी तीन पोलिस निलंबित केले म्हणजे सोमनाथला न्याय मिळाला का? असा सवालही उपस्थित केला. दोन महिन्यांच्या वर काळ गेला तरी पोलीस यंत्रणा सर्व आरोपी पकडू शकले नाहीत.
लातूर जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून वेदम मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा दोन महिन्याच्या उपचारादरम्यान दुवैवी मृत्यू झाला. आहे. लोकांना त्यांची ‘जात’ खटकली. मुख्यमंत्री म्हणतात ‘राज्यातील कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगली आहे पण प्रत्यक्षात तसे नाही. सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी निर्बंध लादलेल्या आहेत.