हातकणंगले विधानसभा मतदारसंघात डॉ. मिणचेकर यांच्या दोन टर्म सोडल्या तर सातत्याने याठिकाणी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. जयवंतराव आवळे २५ वर्ष, त्यांचे पुत्र राजूबाबा आवळे यांनी ५ वर्ष तर त्यांच्याच परिवारातील राजीव आवळे यांनी ५ वर्ष अशी ३५ वर्षे आवळे परिवाराने या मतदार संघावर हुकूमत गाजविली आहे.
माजी खा. जयवंतराव आवळे यांनी ५ टर्म सलग विजय मिळविला. ६ व्या वेळी मात्र त्यांचेच पुतणे राजीव किसन आवळे यांनी त्यांचा विजयी परंपरा खंडीत केली. पहिल्यांदाच जनसुराज्यला गुलाल लागला. त्यानंतर मात्र दोन वेळा मिणचेकर आणि एक वेळ राजूबाबा आवळे अशी १५ वर्षे हा मतदार संघ जनसुराज्यच्या हातून निसटत होता. मात्र या निवडणुकीत डॉ. अशोकराव माने बापू यांच्या रूपाने पुन्हा एकदा या मतदारसंघात जनसुराज्यने गुलाल उधळला आहे.
