खानापूर व विसापूर भागात पाटील, देशमुख यांचा जनसंपर्काचा अभाव….

खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर, महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील व अपक्ष राजेंद्र देशमुख अशी तिरंगी लढत होती. वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, डॉ. विश्वजित कदम यांच्या सभा झाल्या, मात्र त्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. याशिवाय पाटील यांचा मतदारसंघात जनसंपर्काचा असलेला अभाव, गमावलेला विश्वास, जुन्या – नव्या कार्यकर्ते, नेत्यांचा नसलेला ताळमेळ पाटील यांच्या पराभवला कारणीभूत ठरला. राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केली.

देशमुख कुटुंबियांमध्ये एकवाक्यता नसल्याचे सुरवातीला दिसून आले. खानापूर व विसापूर भागामध्ये जनसंपर्काचा त्यांचा अभाव प्रामुख्याने दिसून आला. आटपाडी तालुक्याची अस्मिता हा मुद्दा घेऊन ते निवडणूकीला सामोरे गेले. परंतु मतदारांनी त्यांना धुडकावले. एकंदरीत या निवडणूकीत पुन्हा एकदा खानापूर विधानसभा मतदारसंघात बाबरांची पकड मजबूत झाल्याचे दिसून आले.