भाजपला अपमानित करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाचे यश आहे. म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढविण्यात येणार आहेत, तर इचलकरंजी महापालिकेत पहिला महापौर हा भाजपचा असेल, असा विश्‍वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला. ज्यांनी भाजपला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, असे हाळवणकर यांनी यावेळी स्पष्ट करीत भाजपच्या बंडखोरांचे परतीचे मार्ग बंद केले. प्रवेश द्यावयाचा असेल तर त्यासाठी हाळवणकर आणि आवाडे अशा दोघांची संमती घ्यावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.