इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल बेडगे 

इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्त करण्यात आली. सदर नियुक्तीचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी दिले आहेत. इचलकरंजी नगरपालिकेचे तीन वर्षापूर्वी महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर पहिले आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्त करण्यात आली. गेल्या तीन वर्षांमध्ये महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली नसल्यामुळे महानगरपालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात नाही.

त्यामुळे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना प्रशासक पदाचा पदभार शासनाने दिला होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्त शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांनी केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मंजूरी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. दरम्यान, सदरची नियुक्तीही राजकीय वादातून झाली असल्याची चर्चा शहरात सुरू होती.