लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इचलकरंजी शहरात गेली १० वर्षापासून शाहू महोत्सव आयोजिला जातो. यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदाचा शाहू महोत्सव सहा दिवसांचा असेल. रविवारी १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजलेपासून इचलकरंजी आयडॉल गायन स्पर्धा व डान्स इचलकरंजी डान्स नृत्य स्पर्धा रोटरी क्लॅब दाते माळा येथे होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरी ५ डिसेबर रोजी होणार आहे.
८ डिसेबर रोजी घोरपडे नाट्यगृहात दुपारी १२ ते १ वाजेपर्यत महिलांसाठी पाक कला स्पर्धा होणार आहे. १४ डिसेबर रोजी दुपारी १२ वाजता संविधान जागर कार्यक्रम सौ. गंगामाई गर्ल्स हायस्कुल अॅन्ड ज्यु. कॉलेज या ठिकाणी होणार आहे. १७ डिसेबर रोजी सकाळी ११ वाजता शाहू ग्रंथ दिंडी मलाबादे चौक (जनता चौक) ते घोरपडे नाटयगृह चौक पर्यंत काढण्यात येणार आहे. २२ डिसेबर रोजी लोकराजा शाहू पुरस्कार सोहळा, नृत्य गायनाची महाअंतिम फेरी, बक्षिस वितरण समारंभ होणार आहे.