आचार्यश्री शांतीसागर महाराज यांच्या नावाने टपाल तिकीट प्रसिद्ध; खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश

जैन समाजाचे प्रथम आचार्य शांतीसागर महाराज यांच्या नावाने केंद्र सरकारने पाच रुपयाचे टपाल तिकीट काढावे, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी २०२० साली केंद्रीय मंत्री होती. या मागणीला यश आले असून नुकतेच टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. सकल जैन समाजाच्यावतीने केंद्र सरकार आणि खासदार धैर्यशील माने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जैन धर्मियांचे श्रद्धास्थान प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराज यांची जन्मशताब्दी २०२० साली होती. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या नावाचे पाच रुपयाचे टपाल तिकीट प्रसिद्ध करावे, अशी मागणी लक्ष्मी सेन मठाचे मठाधिपती जगद्गुरु लक्ष्मसेन भट्टारक महास्वामी कोल्हापूर नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेनजी भट्टारक महास्वामी, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, किरण पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी, जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली होती.

याबाबत मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे पत्राद्वारे २ ऑगस्ट २०२० साली केली होती. याबाबतची प्रक्रिया सुरू होती. या पाठपुराव्याला यश आले असून प्रथम आचार्य शांतीसागर जी महाराज यांचा २०२४ हे आचार्य शताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने तिकिटाचे प्रकाशन झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, आम प्रकाश आबिटकर, विश्वविजय खानविलकर यांच्या उपस्थितीत तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटना राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, किरण पाटील, प्रमोद पाटील, गोमटेश्वर पाटील, अमित जोशी, जयवंत पाटील, विद्याधर लाटवडे, अशोक मुसळे, दीपक पाटील सचिन पाटील, धुळोबा पाटील, प्रशांत गुरव, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.