मानेवाडीत दानपेटी फोडून ५ हजार लंपास

आटपाडी, मानेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री. जकाई देवी मंदिराच्या दानपेटीतून ५ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी १ जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वसंत सुखदेव मेटकरी (७५ , व्यवसाय पुजारी) यांनी फिर्याद दिली. मंदिराचे दरवाजे खुले असतानाच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली. पोलिसांनी बापूराव पांडुरंग वाघमोडे (रा. मानेवाडी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.