आमदार राहुल आवाडे यांची ग्वाही……

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची 21000 उत्पन्नाची मर्यादा ही लाडकी बहीण योजनेसाठीच्या उत्पन्न मर्यादेप्रमाणेच करावी, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांच्या मुलांसाठीची 25 वर्षे वयाची अट रद्द अध्यादेशाची पूर्णतः अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आमदार राहुल आवाडे यांना संजय गांधी निराधार योजना समितीतर्फे देण्यात आले. दरम्यान यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करून लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी शिष्टमंडळात दिलेली आहे.