मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील महिला, शिवणे ता. सांगोला येथे मुक्ताई मंगल कार्यालयात नातेवाईकाच्या विवाहनिमित्त आली असता, सदर महिलेच्या पर्समधील सुमारे ९० हजार रुपये किंमतीचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण
चोरीस गेले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिनांक १३ डिसेंबर रोजी विद्या अविनाश लेंढवे रा. आंधळगाव ता. मंगळवेढा यांनी सांगोला पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ह्या
नातेवाईकाच्या विवाहनिमित्त दिनांक ७ डिसेंबर रोजी मुक्ताई मंगल कार्यालय शिवणे ता. सांगोला येथे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आंधळगाव ता. मंगळवेढा येथून आल्या होत्या. त्यानंतर कपडे बदलण्यासाठी मंगल कार्यालयातील वधु पक्षाच्या रुममध्ये गेल्या होते. तेथे कपडे बदलून, सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवून जेवणाच्या हॉलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेल्या होत्या.
परत साडे आठ वाजण्याच्या सुमारास वधु पक्षाच्या रुममध्ये गेल्या नंतर पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण पाहिले असता, सदरचे गंठण चोरीस गेल्याचे लक्ष्यात आले.
