इचलकरंजी शहरात विविध ठिकाणे, चौक येथे सुरक्षेसाठी २४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्यातील केवळ २० सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीत आहेत. २२८ सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असल्याची माहिती इचलकरंजी नियंत्रण कक्षाकडून मिळाली. या पार्श्वभूमीवर ‘आप’तर्फे पोलिस उपाधीक्षक साळवे यांची भेट घेतली. गांभीर्याने पाऊल उचलून शहरातील सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
शहरातील बंद असलेले सर्व सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा, अशी मागणी आम आदमी पक्षाकडून केली. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी अभिषेक पाटील, संतोष पोवार, अर्जुन बागडे, नारायण पारसे, राहुल मिणेकर, भैय्या राजन्नावर आदी उपस्थित होते.