Crop Insurance : शेतकरी बांधवांसाठी शेवटची संधी! अन्यथा मिळणार नाही पीक विमा, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीएम पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची तारीख आणखी वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा उतरवून शेतकरी आपत्ती, पूर आणि दुष्काळामुळे त्यांच्या पिकांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढू शकतात. रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या पिकांमध्ये गहू-सिंचित, गहू-असिंचित, हरभरा, जवस, मसूर आणि मोहरी पिके समाविष्ट आहेत.

बँकेच्या शाखेतून अर्ज करण्यासाठी, तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकता. याशिवाय

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

पीक विमा योजनेसाठी तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

सर्वप्रथम pmfby.gov.in हा वेबसाईट पत्ता ब्राउझरमध्ये टाका. यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट उघडेल. वेबसाईट उघडल्यानंतर Farmer Application या पर्यायावर . त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर. नोंदणीसाठी तुमचं नाव, रिलेशनशिप (मुलगा, मुलगी, पत्नी वगैरे) आणि वडिलांचे किंवा पतीचे नाव भरावं लागेल. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Verify वर . आता स्क्रीनवर एक Captcha कोड दिसेल, तो टाकून Get OTP . मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Submit करा. वय, जात, लिंग माहिती भरा: तुमचं वय, जात आणि लिंग निवडा.

शेतकऱ्याचा प्रकार निवडा:

शेतकऱ्याचा प्रकार (अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक) आणि जमिनीचे प्रकार (मालक किंवा भाडेपट्टा) निवडा. तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि पिन कोड भरावं लागेल.

आधार कार्ड नंबर टाका आणि Verify वर . त्यानंतर व्हेरिफिकेशन पास झाल्याचा संदेश दिसेल. बँकेचा IFSC कोड आणि खात्याचा तपशील भरून, Create User .

राज्य आणि योजना (प्रधानमंत्री फसल बिमा योजना) निवडा. त्यानंतर तुमचं पीक आणि पेरणीची तारीख भरावं लागेल. तुमचं क्षेत्र आधीच विमित आहे का, ते तपासून, त्यानुसार विम्याची रक्कम भरावी लागेल. त्यानंतर विमा हप्त्याचा तपशील दिसेल.

कागदपत्रांची अपलोडिंग:

बँक पासबुक, सातबारा उतारा, ८ अ उतारा आणि पीक पेऱ्याचं घोषणापत्र यांचे फोटो अपलोड करा. सर्व माहिती तपासून, Submit करा. तुमच्या मोबाईलवर अर्ज क्रमांक आणि विम्याची रक्कम येईल.

डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय किंवा QR कोड वापरून पेमेंट करा. पेमेंट झाल्यावर, अर्जाची पावती डाउनलोड करण्यासाठी Print Policy Receipt पर्यायावर .