इचलकरंजी शहरासह हुपरी येथील मंदिरातील चोऱ्यांचा छडा लावण्यात गावभाग पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे .याप्रकरणी अभिषेक राजेंद्र कांबळे वय 18 व पृथ्वीक राजू संकपाळ वय 22 दोघे रा.मानकापूर ता.चिकोडी यांना अटक करण्यात आली आहे .या दोघांकडून इचलकरंजीतील 8 व हुपरीतील 2असे 10 चोरींचे गुन्हे उघडणीस आले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली. विशेष म्हणजे इचलकरंजी व हुपरी येथील सर्वच चोऱ्यांमध्ये समानता आढळून आल्याने चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूर यांनी सांगितले.
