आळतेत डेंग्यू, चिकनगुनियाची साथ, औषध फवारणीसह गटारींची स्वच्छता करण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका जाणवत आहे म्हणजेच अनेक प्रकारचे रोग डोके वर काढताना दिसत आहेत. डेंगू, चुकूनगुनिया, ताप, सर्दी, खोकला अशा विविध आजारामुळे दवाखान्यांमध्ये खूपच गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अशातच आळते येथे गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू, चिकनगुनियाच्या साथीने ग्रामस्थ बेजार झालेले आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी इस्पितळ हाऊसफुल दिसत आहेत. त्यातच थंडीचा जोर वाढल्यामुळे सांधेदुखीचे प्रमाण देखील वाढलेले आहेत. ग्रामपंचायतीने गटारीची स्वच्छता करण्यासह औषध फवारणी करावी अशी मागणी सध्या जोर देत आहे.