राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाल्यानंतर जिल्ह्यातील महायुतीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर, तर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना संधी देण्यात आली आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबिटकर आणि मुश्रीफ यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून इतरही काही आमदारांनी महायुती सरकारच्या काळातही मंत्रिपदावर दावा केला होता. आमदार विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. भाजपकडून आमदार अमल महाडिक हेदेखील प्रयत्नांत होते. मात्र, त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार, हे देखील पाहणी महत्वाचे आहे.
