इस्लामपूरच्या उच्चशिक्षित तरुणाकडून स्मशानभूमी स्वच्छता…

स्मशानभूमी स्वच्छता व प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेबरोबरच विविध जनजागृतीचे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविणार आहे. ‘आपलं गाव, आपली स्मशानभूमी’ या स्पर्धेचेसुद्धा नियोजन करण्याचा मानस आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ५०० व्या स्मशानभूमीची स्वच्छता व वृक्षारोपण करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांनी दिली. लोकराज्य विद्या फाऊंडेशनच्यावतीने स्मशानभूमी स्वच्छता व प्रबोधन अभियान २०१७ पासून तांदळे यांनी सुरू केले आहे. स्मशानभूमीतच समाजप्रबोधनाचे विविध उपक्रम राबवले आहेत. हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे लिखाणही चंद्रशेखर तांदळे स्मशानभूमीतच करीत आहेत. तृतीयपंथी समाजबांधवांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.