पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांचा दिनांक 3 जानेवारी रोजी वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. सांगोला येथे पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने केळकर हॉस्पिटल येथे शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये वंध्यत्व तपासणी मार्गदर्शन व उपचार या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.
सदर उपचारांमध्ये दहा हजार रुपयांची सवलत देखील देण्यात येणार आहे. वंध्यत्व निवारणानंतर प्रेग्नेंसी मधील डिलिव्हरी करता 59% सवलत सामाजिक बांधिलकी म्हणून देण्यात येणार आहे. तरी सांगोला शहर परिसर व तालुक्यातील वंध्यत्व जोडप्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पुरोगामी युवक संघटनेने केले आहे.