आटपाडी , आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, आटपाडी व सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादित , कराड यांच्या सयुंक्त विद्यमाने तालुक्यातील नागरी /ग्रामीण बिगरशेती , पगारदार सहकारी पतसंस्थांमधील संचालक , मॅनेंजर , कर्मचारी यांच्याकरिता उदयराज मल्टीपर्पज हॉल , पंचायत समितीजवळ आटपाडी या ठिकाणी उद्या (गुरुवार ) सकाळी १० ते ५ या वेळेत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षण वर्गामध्ये पतसंस्थांमधील विविध विषयावर तज्ज्ञ् यांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुक्यातील विविध पतसंस्थांमधील प्रतिनिधींनी यामध्ये सहभागी होऊन या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक निबंधक श्रीमती सुषमा शिंदे , प्रशिक्षण वर्गाचे संयोजक व सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश सद्यस्य अश्विनी आठवले , सहकार भारतीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माळी , उपाध्यक्ष चंद्रकांत दौंडे , सहकार भारती सांगली जिल्हा ग्रामीणचे ऑडिट प्रकोष्ट प्रमुख व आटपाडी तालुका नागरी पतसंस्था सचिव सेवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय स्वामी यांनी केले आहे.
