खानापूर घाटमाथ्यासाठी वरदान ठरलेल्या गुहागर-विजापूर महामार्गावरील वाहनधारकांच्या सोयीसाठी लावलेल्या सूचना फलकांची दुरवस्था झाली आहे. या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वळण व अपघात क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी व महामार्गावरील गावांजवळ वाहतुकीच्या नियमांचे फलक लावले होते.
सूचना फलकांमुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत होता. मात्र, सध्या या फलकांची दुरवस्था झाली असून, ते मोडून पडले आहेत. महामार्गावर लावलेल्या अनेक गावांच्या नावांचे फलक गायब झाले आहेत. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्ग व्यवस्थापनाने हे फलक पुन्हा व्यवस्थित लावावेत, अशी मागणी होत आहे.