दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांची 26 वी पुण्यतिथी समारंभ हा दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेली होती. इंग्रजी जुलमी सत्तेच्या जोखडातून तमाम भारतीय जनतेला भूमिगत राहून आणि संघर्ष करून मुक्त करण्याचे कार्य दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी केलेले आहे.
त्यांच्या अथक प्रयत्नामुळे स्वातंत्र्याची रसाळ फळे सर्वांनाच चाखता आलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर पूज्य रत्नाप्पाण्णानी सहकार, शेती, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांमध्ये अनेक नामवंत संस्था स्थापन करून शेतकरी, दलित, गोरगरीब यांचे संसार फुलविले असे प्रतिपादन दे. भ. कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीचे चेअरमन दलितमित्र आमदार डॉ. अशोकराव माने यांनी यावेळी केले.