रेंदाळात घरफोडी रोख रक्कमेसह दागिने लंपास!

रेंदाळ येथील एका राहत्या घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६९ हजारांहून अधिक मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना रेंदाळ जंगम वाडी मुख्य रस्त्यावर मेघराज मंदिर परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील साहित्य विस्कटून त्यामधील सोन्याचे मंगळसूत्र मनी असलेले जुवाकिंस बोरमाळ कानवेल असे एकूण २४ ग्रॅम वजनाचे दागिने किंमत १ लाख १७ हजार चांदीचे पैंजण ब्रासलेट १८० ग्रॅम किंमत १० हजार व रोख रक्कम १५ हजार असा एकूण १ लाख ६९ हजारांहून अधिक मुद्देमाल लंपास केला आहे.

या घटनेने रेंदाळ परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केदार सदानंद माळी रा. मेघराज मंदिर समोर जंगम वाडी रोड रेंदाळ यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हुपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.