पट्टणकोडोलीतील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील मनसेच्या वतीने शाळांना सीसीटीव्ही बसविण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये प्रत्येक वर्गात व शाळेच्या परिसराध्ये १५ दिवसांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले. यामध्ये जिनरत्न पब्लिक स्कूल, संस्कारदीप ज्ञानमंदिर, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या विद्यामंदिर पट्टणकोडोली, बापूसो हुपरे हायस्कूल, दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल, अनंत विद्यामंदिर या शाळांना निवेदन दिले. यावेळी विभाग अध्यक्ष अन्वर जमादार, तालुका संघटक रविंद्र जाधव, शहराध्यक्ष रविंद्र आडके, प्रल्हाद म्हाकवे, विठ्ठल गावडे, सुशांत जाधव, संतोष चव्हाण, सुजय जाधव, अवधूत किर्तीकर, अजित बाळाई, मंगेश म्हेत्तर, लहू जाधव, वैभव भोजकर आदी उपस्थित होते.