आता रेशन धान्य विकणार्‍यांना बसणार लगाम!

‘रेशन धान्याची मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारात विक्री होते. गरज नसतानाही तांदूळ लाभाथ्यारना वितरित केला जातो. हाच तांदूळ खुल्या बाजारात विकला जातो. राज्यात वेगवेगळ्या भागांत अशा घटना पुढे आल्या आहेत’,असा मुद्दा आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.

खुल्याबाजारात रेशन धान्याची विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’,असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.रेशन दुकानात मिळणार्‍या तांदळाचा दर्जाही निकृष्ट दर्जाचा असतो. कुठेही तपासणी केली जात नाही.

70 ते 80 ट क्केतांदूळ अपात्र ठरेल, अशी स्थिती आहे. धान्य वाहतूक करण्यातही अतिरिे खर्च केला जातो, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.तांदूळ खरेदीतही भ्रष्टाचार होतो. वाढलेला भ्रष्टाचार केव्हा थांबणार, असा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला. 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ दिला जातो. हाच तांदूळ पुन्हा व्यापार्‍यांकडे येतो.

हा काळाबाजार थांबविण्यासाठी काय प्रयत्न होणार, असा मुद्दा आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. अमरावतीत 50 लाखांच्या वर तांदूळ पकडला गेला. हा प्रश्न राज्यव्यापी आहे,असेही ठाकूर म्हणाल्या.