आटपाडी , पाटील मळा, करगणी (ता. आटपाडी ) येथे राहणाऱ्या साहिली महादेव सरगर (वय १६) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, दि. ७ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती साहिलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक विनय बहिर,उपनिरीक्षक राजीव केंद्रे व अन्य कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. सहायक उपनिरीक्षक एम. एम. आवळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
साहिली १६ वर्षाची होती . करगणी येथील बनपुरी रस्त्यावरील पाटील मळा परिसरात राहत होती. सकाळी तिने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी ८ वाजता हा प्रकार कुटंबीयांच्या लक्षात आला. साहिलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत साहिलीचे वडील सचिन सीताराम सरगर (वय ४२,रा. करगणी ) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
