कडेगांवमध्ये पोलिस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक!

कडेगांव पोलिस ठाण्यात भावाविरोधात गुन्हा दाखल करून त्यासाठी ५ हजारांची लाच घेण्याचा पोलिस अधिकाऱ्यालाच आग्रह करणाऱ्या तरुणाला लाच देताना रंगेहात पकडण्यात आले.

कडेगाव येथे मंगळवारी दुपारी लचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे अधिकाऱ्यालाच लाच घेण्याचा आग्रह करूनत्याच्या विरोधातच त्या तरुणाने लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. अभिजित नारायण गोरड (वय ३६, रा. उपाळेमायनी, ता. कडेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.गोरड याने कडेगाव पोलिस ठाण्यात भावाविरोधात तक्रार अर्ज केला होता.

त्या अर्जानुसार गुन्हा दाखल करून त्यासाठी पहजारांची लाच घेण्याचा पोलिस अधिकाऱ्यालाच आग्रह त्याने धरला होता. त्या पोलिस अधिकाऱ्याला लाच घेण्याचा आग्रह करून त्याच पोलिस अधिकार्याच्या विरोधात त्याने सांगलीतील लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मात्र गोरड लाचदेण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार संबंधित पोलिस अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. मात्र तक्रारदार पोलिस अधिकाऱ्याला घेणे मान्य नसल्याने त्यांनी गोरड याच्याविरोधात तक्रार दिली होती.

विभागाने याची पडताळणी केल्यानंतर गोरड याने ५ हजारांची लाच घेण्याचा आग्रह केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी गोरड याला लाच देताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हादाखल करण्याचे काम सुरू आहे.