इस्लामपूर पालिकेसमोर आत्महत्या करण्याचा इशारा …

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच जोर देत आहे. तसेच अनेक प्रकारचे आंदोलने अनेक मागण्यांसाठी गावोगावी देखील केले जातात. इस्लामपूर पालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात उद्या शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी अलका सुनील माळवदे या पालिकेसमोर आत्मदहन करणार आहेत. तसे निवेदन मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अलका यांचे पती सुनील माळवदे हे इस्लामपूर नगरपालिकेमध्ये मुकादम म्हणून कार्यरत होते. २० वर्षे २ महिने २३ दिवस इतकी त्यांनी सेवा केली होती. आजारपणामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सुनील माळवदे यांचे १५ जुलै २०१८ रोजी निधन झाले. २०१३ पासून त्यांना पेन्शन दिलेली नाही.

भविष्य निर्वाह निधी, पेन्शन यासाठी मागणी केली होती, पण अद्याप पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी इस्लामपूर नगरपालिकेच्या झेंड्याखाली शुक्रवारी विषारी औषध पिऊन आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे.