इस्लामपूर येथील शिवाजी चौकातील बळवंतराव बाबाजी पाटील उरुण विकास सोसायटीच्या विविध इमारतींचे भूमिपूजन खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास आणि प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील, अॅड. शुभांगी पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, उद्योजक सर्जेराव यादव, राष्ट्रवादीचे दादासाहेब पाटील, शहाजी पाटील, अॅड. चिमण डांगे, माजी नगरसेविका सुप्रिया पाटील, आपचे गजानन पाटील उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा सत्कार करण्यात आला.