आमदार डॉ. राहुल आवाडे  यांनी दिली ग्वाही! पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न तसेच …..

सोमवारी प्रेस क्लब ऑफ इचलकरंजी च्या वतीने सोमवारी पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले की पत्रकार हे वृत्तपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडत असतात.

जनतेचे प्रश्न ते वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडत असतात त्यामुळे प्रशासन आणि तसेच लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढते. शहराच्या विकासासाठी अधिकाधिक विकास कामे तसेच शहरासाठी अधिकाधिक निधी आणण्याची जबाबदारी माझी राहील. पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न तसेच संरक्षण कायदा याबरोबरच अनेक प्रश्नांची प्रामाणिकपणे सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार डॉ. राहुल आवाडे  यांनी दिली.