लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता आमदार खासदार यांनी नागरिकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघातुन सुहास भैय्या बाबर यांची आमदारपदी निवड झाली. आमदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी आमदारकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आ. त्यांनी आतापर्यंतच्या इतिहासात नगरपालिकेत पहिल्यांदाच आढावा बैठक घेतली. नगरपालिकेच्या लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात बैठक घेतल्याने मतदारसंघात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार बाबर यांनी अशा आढावा बैठका घेऊन विविध विभागाच्या कामाची माहिती घेऊन जनतेच्या अडचणी सोडवाव्यात ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
