डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पाच नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षापासून एक पदवी आणि चार पदव्युत्तर, अशा एकूण पाच नवीन अभ्यासक्रमांना अधिकृत मान्यता मिळाली आहे, अशी माहिती संस्थे सचिव अॅड. चिमण डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे व महाविद्यालयाचे संचालक डॉ. एल. वाय. वाघमोडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली.

चिमण डांगे म्हणाले, मंजुरी मिळालेल्या अभ्यासक्रमामध्ये बी.टेक. रोबोटिक्स अॅण्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम.टेक. इन सिव्हिल इंजिनीअरिंग (कॉम्प्युटर एडेड स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग) एम.टेक. इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन एम.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग एम.टेक. इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम यांचा समावेश आहे. या महाविद्यालयाला नॅक, बेंगलोर यांचेकडून अ + + दर्जा बहाल करण्यात आला असून सर्व पात्र अभ्यासक्रमांना एन. बी. ए. मानांकन मिळालेले आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून स्वायत्त दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. डॉ. एल. वाय. वाघमोडे यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयातील सर्व अधिष्ठात्ता व विभागप्रमुख उपस्थित होते.