भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह देखील पाहायला मिळत आहे. या भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटन पर्व अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर तसेच आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. हे अभियान 11 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून तब्बल 15790 सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व होऊन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन देखील यावेळी मान्यवरांनी केले.
इचलकरंजीत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
