सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर आहेच. पाण्यासाठी येथील नागरिकांना खूपच वणवण करावी लागते. फलटण विधानसभेची जागा जिंकल्यानंतर यापुढे सोलापूर जिल्हा व विशेषतः माढा मतदारसंघावर भाजप वाढीसाठी विशेष लक्ष देणार असल्याचे माढ्याचे खासदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, माढा मतदारसंघांमध्ये लोकसभेला माझा पराभव झाल्यानंतर मी फलटण विधानसभेवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. महायुतीमध्ये ही जागा कोणत्याही पक्षाला मिळाली तरीही फलटणची जागा निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. माझ्या प्रयत्नाला यशही मिळाले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले माढा मतदारसंघावर माझे विशेष प्रेम या अगोदर होते आणि आताही आहे. फक्त विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यावर विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात माझे थोडे दुर्लक्ष झाले होते. परंतु आता विधानसभेची जागा जिंकल्यामुळे फलटणचे माझे काम पूर्ण झाले असून यापुढे मी सोलापूर जिल्हा व विशेषतः माढा मतदारसंघातील विकासाच्या अपूर्ण कामांकडे लक्ष देणार आहे. फलटण – पंढरपूर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याशिवाय व निरा – देवधरचे पाणी सांगोल्यापर्यंत गेल्याशिवाय मी कोणत्याही स्वरूपाचा सत्कार स्वीकारणार नसल्याचे या अगोदरच जाहीर केले आहे.मी यासाठी अध्यापही सत्कार स्वीकारत नाही