कुंभोज दानोळी रोडवर फोरव्हीलरचा अपघात, जीवितहानी नाही…..

अलीकडच्या काळात अपघांताच्या प्रमाणात वाढच सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक कारणास्तव अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. जास्त वेगाने गाडी चालविणे,मद्यपान करणे, स्पीडब्रेकरचा अंदाज न येणे यामुळे तसेच आजकाल तर ऊस वाहतूकीमुळे देखील अपघात होतानाचे चित्र आहे.
असाच एक अपघात कुंभोज दाणोली रोडवर घडला आहे.

कुंभोज दानोळी रोडवर संतोष माळी यांच्या मळ्याजवळ फोरविलर गाडीचा अपघात झाला आहे. यावेळी गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवदानी झालेली नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व गाडीची पाहणी केली. त्यामध्ये सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.