सध्या सगळीकडे यात्रांचे दिवस आहेत. यात्रेसाठी परगावी असलेले लोक गावाकडे परतत असल्याचे चित्र दिसतच आहे. यात्रेनिमित्त अनेक भागात विविध कार्यक्रम घेतले जातात. याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील भेटतो. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावात देखील खिलार जनावरांची यात्रा भरवली जाते. पौष महिन्यात श्री सिद्धनाथ देवाच्या खरसुंडीत पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी जातिवंत खिलार जनावरांची यात्रा रविवारपासून भरवण्यात येणार असून, या यात्रेत शेतकऱ्यांना सोई व सुबोधा देण्याबाबत आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, सरपंच धोंडीराम इंगवले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
रविवार दि. १२ रोजी शेळ्यामेंढ्याची यात्रा, तर १३ ते १८ अखेर जनावरांची यात्रा खरसुंडी – नेलकरंजी रस्त्यालगत घोडखूर व वीजबोर्ड परिसरात कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी व ग्रामपंचायत खरसुंडी यांचे संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणार असल्याचे निश्चित केले. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, सरपंच धोंडीराम इंगवले, उपसभापती राहुल गायकवाड, सुबराव पाटील, शंकर भिसे, सचिव शशिकांत जाधव, नारायण ऐवळे, राजाक्का कटरे, शफिक तांबोळी. राहल गरव उपस्थित होते.