सध्या अनेक भागात विकास कामांसाठी नेते मंडळींकडून सरकारद्वारे निधी मंजूर करून आणत असल्याचे चित्र दिसतच आहे. ज्यामुळे शहरात अनेक विकासकामांची सुरुवात देखील झालेली आहे. तसेच नूतनीकरण देखील होत आहे. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील गेले कित्येक वर्षे विकासापासून वंचित असलेला पंचगंगा नदी घाट हा परिसर आहे. चंदूर गाव विविध धार्मिक कार्यासाठी प्रसिद्ध असून यामध्ये नदीकाठ येथे विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होत असतात. जकूबाईचा पाळणा, गौरी आवाहन, परडी सोडणे, महासिद्ध देवाचा दंडवत असो. अशा विविध धार्मिक कार्यक्रमासाठी ग्रामस्थांना नदीवर यावे लागते. परंतु तेथे असणारी असुविधा व अस्वच्छता या सर्वांचा सामना करत विविध धार्मिक उत्सव ग्रामस्थांना नाईलाजाने साजरे करावे लागायचे. यासाठी घाट बांधकाम करणे आवश्यक होते. यावर्षी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निधीतून व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून महेश पाटील यांनी तब्बल दीड कोटीचा निधी मंजूर करून आणला व नदी व घाट परिसराचे नंदनवन करण्यास सुरुवात केली.
चंदूर पंचगंगा घाट परिसराचे होणार नंदनवन! विकासकामांची सुरुवात
