भरचौकात प्रेमप्रकरणातून कोयत्याने वार, वाहतूक पोलिसामुळे टळला पुढचा अनर्थ…..

अनेक वेगवेगळ्या कारणास्तव खून, मारामारीत वाढ होत आहेच त्याचप्रमाणे अलीकडे प्रेमप्रकरणात खूपच वाढ होत चालल्याचे चित्र दिसत आहे. काही प्रेमप्रकरणाना यश येत पण काहींना या प्रेमप्रकरणात जीव देखील गमवावा लागत आहे. विठुरायाच्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या जवळच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने हल्ला झाला आहे.

भर वर्दळीच्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी एकावर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाहतूक पोलीस आल्याने हल्लेखोर फरार झाली असल्याची माहिती आहे. आज गुरूवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोयत्याने वार झाल्याने खळबळ उडाली. वाहतूक पोलीस आल्याने हल्लेखोर फरार आणि पुढचा अनर्थ टळला. वाहतूक पोलिस येताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. घटनेतील मोटार सायकल सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

मुलीच्या प्रेम प्रकरणावरून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर जखमी व आरोपी दोघेही पंढरपूर शहरातील डाळे गल्ली भागातील आहेत.या घटनेत जखमी झालेल्या तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहराच्या अत्यंत प्रमुख चौकात मंदिराजवळ झालेल्या या घटनेने भाविकांमध्ये, दुकानदार आणि नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपीने निर्घृणपणे कोयत्याने वार केले आहेत.