राष्ट्रवादी शरद पवार गटाची चिंतन शिबीरात आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिंतन शिबिरात प्रदेशाध्यक्ष पदाला विरोध असल्याचे चित्र दिसून आले. जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी काही नेत्यांनी केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.शरद पवार गटात जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला होणारा विरोध हा त्यांचा मराठा द्वेष दाखवतो का? असा सवाल त्यांनी केलाय.
जयंत पाटलांवर स्तुतीसुमनं उधळतांना मिटकरींनी त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कामांचा दाखला दिला आहे. यासोबतच प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार उतावीळ झालेत का? असा सवालही त्यांनी केलाय. जयंत पाटलांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे अनेक दुर्योधन शरद पवार गटात असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.
दरम्यान, काही महिन्यापूर्वीच सांगितलं होतं जयंत पाटील यांचा कुणीतरी करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत आहे. तेच काल दिसल्याचे मिटकरी म्हणाले. मराठा प्रदेशाध्यक्ष सोडून कोणीही करा, असा हट्ट होतो. त्यांच्यात मराठा द्वेष भरला आहे का? असा सवाल मिटकरींनी केलाय. जयंत पाटील यांच्यासारखा मोठा नेता, ते प्रत्येक बूथपर्यंत गेले.
मोठं संघटन त्यांनी केलं. अशा एवढ्या मोठ्या नेत्याला हटवण्याचा घाट घातला जातोय असे मिटकरी यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाडांनाच अथवा कर्जत जामखेडच्या आमदाराला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे का?असा सवालही यावेळी मिटकरींनी केला. जयंत पाटील यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेणारे अनेक दुर्योधन तिकडे आहेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला.