काळ सकाळी आटपाडी परिसरातील नागरिकांना सरकार वाडा परिसरातील जुन्या इमारतीस आग लागण्याचे निदर्शनाला आले.अचानक आग लागण्यामुळे लोक वस्ती असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशामक दलाला यश आले. आग आटोक्यात आण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरपंचायतकडून प्रयत्न केले. सरकार वाडा ही औध संस्था कालखंडातील वास्तू आहे. नगरपंचायतकडे मोटारसायकल अग्नीशामक गाडी असून त्यासाहाय्याने आग आटोक्यात येत नसल्यामूळे लगेचच विटा येथे अग्नीशामक दलाची तुकडीला पाचयण केले. त्यामुळे आग आटोक्यात येण्यास मदत झाली.
सरकार वाड्यात प्रशासनाने सुशोभन करण्यासाठी पाऊले उचलावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. कितेक वर्षे सरकार वाडा सुशोभीकरणाचा मुद्दा रखडला गेला आहे. त्याठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय तलाठी कार्यालय होती. त्यांचे स्थलातंर आता तहसलिदार कार्यालयात करण्यात आले आहे. नगरपंचायत कार्यालय इमारतीसाठी सध्या जागा शोध मोहित सुरू असून आटपाडी शहरातील बाजारपेठला चालना मिळण्यासाठी सरकार वाडा परिसरात नगरपंचायतीची इमारत उभे करावी अशी मागणी युवा नेते गजानन देशमुख यांनी मांडली आहे. सरकार वाडा ही अध संस्था कालखंडातील ठेवा आहे. पूर्वीच्या काळात सरकार ऑफिस त्यामध्ये होती. शासनाकडून त्याभागात सुशोभीकरण करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी तात्काळी शासनाने सुशोभित करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी आटपाडी शहरातील नागरिक करीत आहेत.