सांगोला आठवडा बाजारात पार्किंगची सोय स्वतंत्र करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

वाहतुकीच्या पार्किंगचा प्रश्न अनेक भागात सऱ्हास पहायला मिळतच आहे. पार्किंगच्या गैरसोईमुळे वाहक तसेच पादचारी याना अनावस्थ त्रास सहन करावा लागतो आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातांच्या प्रमाणातहि वाढ होत चाललेली आहे. सध्या पार्किंगची समस्या सांगोला तालुक्यात पहावयास मिळत आहे. रविवारी सांगोला तालुक्यातील आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असून, या बाजारासाठी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी तसेच भाजीपाला कधी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

दरम्यान भीमनगर समोर रस्त्याच्या मधोमध तसेच आजूबाजू परिसरात वेगवेगळे स्टॉल व्यापारी तसेच भाजीपाला विक्रेते बसलेले असतात. यामध्ये भीमनगर, साठेनगर सनगर गल्ली, खाटीक गल्ली, आणि परिसरातील आबालवृद्ध नागरिकांना हॉस्पिटल साठी घराबाहेर पडणे देखील मुश्किल होते. तसेच व्यापाऱ्यांच्या आणि बाजारकरूंची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होते. यामुळे सांगोला पोलीस स्टेशन व नगरपालिका यांनी आठवडा बाजार बाबत चर्चा करून शहरांमध्ये येणारी जड वाहतूक तसेच जनावरे खरेदी करण्यासाठी आलेले चार चाकी वाहन बाजारामध्ये न येऊ देता त्यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात यावी.

दरम्यान एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील. या मागणीबाबत प्रशासनाने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा नाविलाजास्त तीव्र आंदोलन छेडावे लागेल या होणाऱ्या परिणामास सांगोला नगरपरिषद व सांगोला पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. सदरचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी स्वीकारले.
सदरचे निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अॅड. अक्षयदादा बनसोडे, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, इम्तियाज मनेरी, चंद्रकांत कांबळे, प्रवीण पगारे, अशोक माने, शहीद चौधरी, अनिकेत पाटील, मच्छिंद्र धनवडे आदी उपस्थित होते.