दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढच होत चाललेली आहे. खून, मारामारी, फसवणूक, तसेच अवैध्य धंदे राजेरोसपणे अनेक भागात सुरु असल्याचे चित्र आपण पहातच आहोत. सध्या महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील ग्रामस्थ तसेच हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.आळते येथील महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याप्रकरणी अजीज इकबाल नदाफ (वय २९, रा. चौगुले स्टॉप, आळते) याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेने आळते परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आणि संशयीत आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी शनिवार दि. १८ रोजी आळते गाव बंद ठेवण्याचा निर्णय आळते ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने घेण्यात आला. आळते येथील अजीज नदाफ हा युवक गावातीलच एका युवतीचा गेल्या ४ महिन्यांपासून पाठलाग करुन तिला मानसिक त्रास देत होता. गुरुवारी त्याने तिची छेड काढल्याने त्याच्या विरोधात शुक्रवारी हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.