कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची शनिवारी रात्री नियुक्ती झाली. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी चर्चेत असलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिमचे पालकमंत्रिपद देण्यात आले. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सह-पालकमंत्री नेमण्यात आले असून, नगरविकास, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. मिसाळ या पर्वती (पुणे) मतदारसंघातून भाजपकडून विधानसभेवर गेल्या आहेत. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सह-पालकमंत्री नेमण्यात आले. भाजपला आपले सत्तावर्चस्व या जिल्ह्यात राहावे यासाठीच हे पद निर्माण केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदेसेनेला रोखण्यासाठीही ही खेळी असू शकते. सहपालकमंत्रिपदाच्या माध्यमातून निधी वाटपात वाटेकरी आल्याचे म्हटले जात आहे.
प्रकाश आबिटकर कोल्हापूरचे पालकमंत्री; भाजपच्या माधुरी मिसाळ पहिल्या सह-पालकमंत्री
