कोरोची महाशिवरात्र यात्रेनिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन….

सध्या अनेक भागातील यात्रांचे सिझन सुरु आहेत. यात्रानिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जातात. विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पहायला मिळतो. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे गावचे ग्रामदैवत श्री मारुती देव, लंगरी साहेब उरूस महाशिवरात्री यात्रा २६ फेब्रुवारी २०२५ ते १ मार्च २०२५ पर्यंत होणार असून यात्रेनिमित्त भरगच मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोची गावचे ग्रामदैवत श्री मारुती देव, लंगरी साहेब उरूस महादेव महाशिवरात्री यात्रा २६ फेब्रुवारी २०२५ ते १ मार्च २०२५ पर्यंत होणार असून यात्रेनिमित्त भरगच मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामदैवत मारुतीचा अभिषेक करून यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे तसेच २७ फेब्रुवारी २०२५ रोजी भर यात्रा, बैलगाडी मिरवणूक ग्रामदैवत मारुती पालखी मिरवणूक आणि तमाशा आयोजित केला आहे.

२८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी गुरू महाराज यांना साखर ठेवणे आणि दुपारी चार वाजता भव्य कुस्ती मैदान व लंगरी साहेब उरूस आणि रात्री १० वाजता ऑर्केस्ट्रा व १ मार्च २०२५ रोजी रात्री आर्केस्ट्रा असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष व सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी यांनी दिली. मंगळवारी सकाळी ग्रामदैवत मारुती मंदिर येथे बुक पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानाच्या पाच पावती करून यात्रेसाठी वर्गणी गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली.