मौजे वडगावात आढळला सडलेल्या अवस्थेत डॉक्‍टरचा मृतदेह

सतत अनेक काहीना काही धक्कादायक बातम्या या घडतच असतात. कधी खुनी हल्ला तर कधी आत्महत्या तर कधी अपघात. या घटनांमध्ये अलीकडच्या काळात खूपच वाढ झालेली दिसून येते. अशीच एक घटना उघडकीस आली. सांगली जिल्ह्यातील डॉक्टराचा मौजे वडगाव गावच्या हद्दीतील पाझर तलावाजवळील झाडीत गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्‍यामुळे हा जीवन संपवल्‍याचा प्रकार आहे की, घातपात हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृताचे नाव डॉ. संतोष जगन्नाथ ढोले (वय 41 रा. धुळगाव ता.कवठेमहाकाळ जि सांगली) असे आहे. मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील पाझर तलावाशेजारी असणाऱ्या झाडीतील एका झाडास प्लॅस्टीक दोरीने गळफास लावलेला लटकणारा मृतदेह जळन ( सरफण ) आणण्यासाठी गेलेल्या महिलांना दिसला. त्या घाबरून गावांत आल्या.

हा प्रकार गावांतील इतर लोकांना सांगितला. त्‍यावेळी लोकांना या ठिकाणी पुर्णपणे सडलेल्या अवस्थेत मृतदेह निर्दशनास आला. गावचे पोलिस पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून खात्री करून घेतली व शिरोली पोलिसांना या बाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेहाची तपासणी केली. ढोले यांच्याजवळ त्यांचे आधार कार्ड, धन्वंतरी हेल्थ केअर सेंटर इस्लामपूरचे ओळखपत्र सापडले. डॉ. ढोले हे गेली दहा वर्षे घरच्यांपासून वेगळे राहत होते.मौजे वडगाव पाझर तलावाशेजारी घनदाट झाडी आहे.

गावापासून तीन ते चार कि मी अंतरावर असल्याने त्या ठिकाणी लोकांची वर्दळ कमी असते. पण आज गावातील काही महिला सरफण आणण्यासाठी गेल्या असता, त्यांना मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसला. हा जीवन संपवण्याचा प्रकार आहे की घातपात यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिस स्‍टेशनमध्ये झाली आहे. या मृत्यू प्रकरणी तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.