इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 घरकुल प्रस्ताव मंजूर!

महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विशेष पाठपुरव्यामुळे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 वैयक्तिक घरकुल मंजूर झाली असल्याची माहीती भाजपाचे इस्लामपूर निवडणुक प्रमुख व सांगली जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या सत्ता काळात या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन ही घरकुलाचे प्रस्तावांना दुर्दैवाने मंजुरी दिली गेली नाही. या घरकुल प्रस्ताव मंजुर व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न केले. इस्लामपूर विधानसभेसह सांगली जिल्ह्यातील 1061 घरकुल प्रस्तांवाना नुकतीच मंजुरी मिळाली आहे.या योजनेमार्फत प्रत्येक लाभार्थीला घरकुल बांधकाम साठी एक लाख वीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या घरकुल मंजुरी बाबत ठेंगा दाखविण्यात आला होता.

महाविकास आघाडीच्या काळात या लाभार्थ्यांना मदतीचा निर्णय प्रलंबित ठेवला होता.सांगली जिल्हा पालक मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी पाठपुरावा करून प्रलंबित असणारी घरकुले मंजूर करून घेतली असून या घरकुल लाभार्थी यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गावनिहाय मंजूर घरकुल पुढील प्रमाणे

कारंदवाडी 3, किल्लेमच्छिंद्रगड 6, खरातवाडी 1, दुधारी 9, गोटखिंडी 1, नागाव 10, जूनेखेड 1, बोरगाव 3, बहे 12, बावची 2, बेरडमाची 14, येडेमच्छिंद्र 3, शिगाव 31, शिरगाव 12, हुबालवाडी 10, जांभूळवाडी 1, बिचुद 4, साखराळे 5, पडवळवाडी 1, भवानीनगर 5, मसुचीवाडी 1, तुंग 6.