सध्या अनेक भागातील विकास कामांसाठी निधी मंजूर केले जात आहेत. ज्यामुळे त्या भागातील ती अडचण दूर होऊन गावातील विकासात भर पडते. पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समिती, पेठ वडगाव त्यांच्या वतीने सर्वपक्षीय गटातटाचे राजकारण न करता क्रीडा संकुल व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार, माजी आमदार, व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले आहे.
मागील २० वर्ष या क्रीडा संकुलाची मागणी होत आहे. अजूनही क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. वडगाव व परिसरातील ३२ गावातील जनतेच्या वतीने वडगाव येथील पालिका चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. पेठवडगावमध्ये मागील २० वर्षांपासून क्रीडा संकुल होण्याची मागणी होत आहे.
पण शासनस्तरावर त्याची योग्य दखल घेतली जात नाही. क्रीडा संकुलाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने आज सकाळपासून पालिका चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, निमंत्रक विजय अपराध, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, जनसुराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पाटील (किणी),
वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, वैभव कांबळे, सूरज तवटे, अभिनंदन शिखरे, विकास नाईक, रणजित पाटील, सचिन पाटील, सागर गुरव, जगदीश पाटील, सागर चोपडे, रोहिणी पाटील, पूनम गुरव आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यरकर्ते, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी यावेळी उपस्थित होते.